चित्ता, बिबट्या, वाघ, सिंह या जगातील सर्वोत्तम शिकारी प्राण्यांचं शिकारीचं यशाचं प्रमाण (success ratio) फक्त २५-३०% आहे.... म्हणजे सरासरी ४ प्रयत्नांमागे एक प्रयत्न यशस्वी होतो
पण यामुळे यांचं श्रेष्ठत्व कमी होत नाही, किंवा हे संपत नाहीत... एखादा शिकारीचा प्रयत्न अपयशी ठरला म्हणुन हे निराश होत नाहीत, तर पुढच्या शिकारीची तयारी सुरु करतात... पुन्हा नवीन शिकार, पुन्हा नवीन प्रयत्न. चार प्रयत्नांमागे एकदा यशस्वी होतात, पण जेव्हा यश मिळतं तेव्हा जंगलावर स्वतःचा दबदबा निर्माण करत असतात....
म्हणुनंच हे जगातील सर्वोत्तम शिकारी आहेत...
कारण श्रेष्ठता यशाच्या आकड्यांवर नाही तर एकुन वर्चस्वावर ठरते.
व्यवसायाचं सुद्धा असच आहे....
प्रत्येक वेळेस यश मिळेल असं नाही.
एखाद्या अपयशाने खचुन जाऊ नका...
जेवढे जास्त प्रयत्न तेवढी यशाची शक्यता जास्त असते हे नेहमी लक्षात ठेवा.
------
श्रीकांत आव्हाड
Comments
Post a Comment