व्यवसाय सल्ला घेताना.....

नविन व्यवसाय सुरु करताना बहुतेक वेळा जन्मात कधीही व्यवसाय न केलेल्या लोकांकडुन सल्ला घेतला जातो... सहाजीकंच ज्याने स्वतः कधी व्यवसाय करायची हिंमत केली नाही तो व्यवसायाबद्दल नकारात्मकंच बोलणार. मग ते तुम्हाला कोणाचा व्यवसाय कसा ठप्प झाला याची उदाहरणे देतात, कोणाला कसं नुकसान झालं याची माहीती देतात, पण टाटा अंबानी सांगायला विसरतात.... ईथंच घोडं अडतं.

तुम्हाला कुठुनही चांगली माहिती मिळत नाही. नकारात्मक लोक तुम्हाला सारखं सारखं तुमच्या निर्णयाबद्दल पुनर्विचार करायला भाग पाडतात आणि व्यवसाय सुरु करण्याआगोदरच त्याबद्दल नकारात्मक मत तयार होतं आणी व्यवसायाचा विचारंच रहित होतो.

व्यवसायाबद्दल सल्ला व्यवसाय करणाऱ्यांनाच विचारा, नकारात्मक उत्तर मिळणार नाही याची खात्री बाळगा. प्रत्येकाकडुनंच बिनकामाचे सल्ले घेण्यापेक्षा स्वतः माहीती मिळवण्याला प्राधान्य द्या. अनुभवी लोकांच्या, व्यवसायीकांच्या भेटी घ्या. त्यांचे अनुभव संकलीत करण्याचा  प्रयत्न करा. व्यवसायाविषयी जास्तीत जास्त ज्ञान वाढवण्याला प्राधान्य द्या. सर्वांच्या अनुभवातुन चांगल्या वाईट गोष्टी हेरुन त्यानुसार स्वतःमधे सुधारणा करा. स्वतःला डेव्हलप करा. स्वतःच्या मनाला, मेंदुला व्यवसायासाठी तयार करा. स्वतःच स्वतःचे प्रशिक्षक व्हा... तुमचा व्यवसाय नक्कीच यशस्वी होईल.

व्यवसाय साक्षर व्हा...
ऊद्योजक व्हा...
समृद्ध व्हा...

_____

© श्रीकांत आव्हाड

Comments