व्यवसायातलं ख्रिस गेल व्हायचं कि सचिन तेंडुलकर ते ठरवा
व्यवसाय म्हणजे ट्वेन्टी ट्वेन्टी सामना नाही. हि एक कसोटी आहे. ग्राउंड वर आल्यावर ख्रिस गेल सारखे दोन चार छक्के चौके मारून तुम्ही प्रेक्षकांची करमणूक कराल पण पुढच्याच क्षणी आउट होऊन ग्राउंड च्या बाहेर जावे लागेल. मोठी खेळी करायची असेल तर सचिन सारखे ग्राउंड वर टिकून रहावे लागते. शंभर चेंडू खेळून एकही धाव नाही झाली तरी चालेल, पण तुम्ही पीच वर आपले पाय घट्ट रोवून उभे राहणे आवश्यक असते. एकदा पीचचा, वातावरणाचा अंदाज आला कि तुम्ही धावा गोळा करायला मोकळे असतात. प्रत्येक ओव्हर मधे एक जरी संधी मिळाली तरी धावफलक वाढत जातो, आणि सरतेशेवटी तुम्ही शतक पूर्ण केलेले असते. पीच वर टिकून राहणारा सचिन म्हणूनच क्रिकेटचा देव बनतो आणि ख्रिस गेलं क्रिकेटमध्ये मनोरंजन करणारा एक सदस्य बनून राहतो.
व्यवसायात तात्काळ यश असे कधीच नसते. काहीजण शॉर्टकट वापरतात, काहींना तात्काळ यश मिळते पण ते प्रमाण ०.००१% पेक्षा जास्त नाही. व्यवसाय यशस्वी करायचा असेल, सर्वोच्च स्थानी न्यायाचा असेल तर आधी तुम्हाला ग्राउंडचा, पीचचा, वातावरणाचा पूर्ण अंदाज घ्यावा लागतो. प्रत्यक्षात, व्यवसाय करायचा म्हणजे नक्की काय करायचे हे शिकून घ्यावे लागते. काही काळ नफा तोटा बाजूला ठेऊन स्पर्धेत पाय घट्ट रोवून उभे राहावे लागते. बाउन्सर असो व गुड लेन्थ प्रत्येक माऱ्याला समर्थपणे आणि शांतचित्ताने तोंड द्यायचे असते. इथे खचलात तर तुमचे स्पर्धेतून बाद होणे निश्चित असते. एकदा का तुम्हाला स्पर्धेचा पूर्ण अंदाज आला कि मग तुम्ही हळूहळू धावा गोळा करायला सुरुवात करायची असते, म्हणजेच प्रत्यक्ष नफ्याचा विचार करून व्यवसाय वाढवायला सुरुवात करायची असते.
व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सुरुवातीचा काही काळ सर्व अडीअडचणींचा सामना करून व्यवसायाच्या पीच वर पाय घट्ट रोवून उभे रहावेच लागेल, येणाऱ्या सर्व समस्यांना खंबीरपणे सामोरे जावेच लागेल, प्रत्येक निर्णय शांतचित्ताने आणि संयमाने घ्यावा लागेल, विश्वास ठेवा यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेताना दिसेल. या नियमाने तुमचे यश हे कायमस्वरूपी असेल आणि आक्रस्ताळेपणाने कृती करताल तर कदाचित यश मिळेलही पण ते क्षणभंगुर असेल.
शेवटी व्यवसायातले ख्रिस गेलं व्हायचं कि सचिन व्हायचं हे ज्याला त्याला ठरवायचं आहे.
_____
© श्रीकांत आव्हाड

(All rights are reserved... violation of copyright will result into legal action)
Comments
Post a Comment